प्रेम कविता इन मराठी
56
“भास”तुझा होताना… भास तुझा होताना चेहरा तुझा येतो डोळ्यांसमोर अलगद येऊन बसते स्मित ओठांवर…भास तुझा होताना आस लागते भेटण्याची मनाला माझ्या ओढ लागते तुला पाहण्याची….भास तुझा होताना प्रीत मनी उमलून येते. कावर बावर होत स्वतःच मनाला सावरते….भास तुझा होताना डोळ्यांत प्रतिबिंब तुझाच दिसतो जणू काय चोहीकडे तूच तू भासतो…भास तुझा होताना हळुवार स्पर्श केल्यासारख वाटतो जणू अलगद येऊन केस माझे कुरवाळल्या सारखं वाटतो…भास तुझा होताना आरश्यात पाहुनी . हलकेसे मी लाजते….जणू तू आरश्यातुन बघतोय असा वावरते… |
57
हव्याच्या झोक्यावर… डोलतो झुमका माझा.. त्याच झुमक्याने चोरला तुझा.. हृदयाचा ठोका… |
58
शब्द सारे… अबोल झाले… हाल जीवाचे… बेहाल झाले… |
59
प्रेम मनाला भावले…. भावना मनाला छळले…. अव्यक्त मन अस्वस्थ झाले एकांतात तुला आठवत राहिले…. वेदना मनात सलत राहिले अश्रू होऊन डोळ्यांना घेरले.. |
60
आयुष्याच पुस्तक म्हणजे, आठवणींचे “पिंपळपान”… नजरेस भरतो फक्त, “दुमडलेला”एक पान… |