84
तुला काहितरी बोलावेसं वाटत मला… तुला काहितरी बोलावेस वाटत मला……. “तु खूप छान दिसतेसं” असं तुला म्हणावेस वाटत मला…….. अंगावर पाऊसाच्या पाण्याचा वर्षाव झाल्यासारखं तु हसतेसं… आणि, आईसक्रिम खायाला नाही मिळालेल्या लहान मुलीसारखं तु रुसतेस… तुझ्या सहवासात राहवेसं वाटत मला….. “तुझा स्वभाव छान आहे” असं तुला म्हणावेसं वाटत मला…….. दुर्मिळ भागातुन वाहणा-या शितल सरितेसारख तु शांत राहतेसं…. आणि, कोकिळेच्या मुखातुन निघणा-या गोड आवाजासारखे तु बोलतेस…. तुझ्या दुनियेत यावेसं वाटत मला…… “माझ तुझ्यावरच प्रेम आहे” असं तुला म्हणावस वाटत मला….. समुद्रामधील शिँपल्यातील मोत्यासारखं तुला माझ्या हदयात ठेवावेसं वाटत मला…… आणि, माझ्या शेवटच्या श्वासापर्यत तुला जिवनभर साथ दयावेसं वाटत मला……. |
85
आताशा फक्त आताशा फक्त अश्रूंचा हा ओला दुष्काळ असेल फक्त तू नसशील तुझी आठवण कायमच असेल मी प्रत्येक समयी माझे स्मित हास्य जपत राहील तुझं अनभिषिक्त प्रेम जर माझ्या नशिबात असेल उजेडाला तुझ्या नयनात खूप जतन करून ठेव आता दूर पर्यंत फक्त संध्या आणि रात्र च असेल उदासवाणी असशील तू अन बेचिराख असेल मी आता मधुशाळेत फ़क्त, फक्त हाच विषय असेल तुला मी तिथे भेटेल जिथे सूर्य अंधकारमय होईल तुझ्या सवे तिमिरातून नवा प्रकाश उगवत असेल वाटसरू आहेस तू आणि आहोत आपण वाटसरू कुठल्या तरी एका क्षणाला भेट तुझी पुन्हा असेल तुझी अन माझी घडेल भेट केव्हा तरी कुठे तरी त्या प्रहरी मौनाला मौनाची भाषा कळाली असेल |