एकतर्फी प्रेम कविता :- जीवन खूप असे विचित्र आहे. तुम्हाला जे वाटते जे पाहिजे ते घडत नाही आणि जे घडते ते विचारात येत नाही. कधी कधी आपल पहिलं प्रेम असं होतं की ते नुसतं होतं पण कळत नाही. आणि जेव्हा कळते तेव्हा ते व्यक्त करायला मन घाबरते. अशाच प्रेमाला आपण एकतर्फी प्रेम म्हणतात. त्याची एक वेगळीच जाणिव आहे. पण ती वेळीच आपण व्यक्त केली नाही तर फक्त आठवणीच राहतात. अशीच एक आठवण मला तुमच्याशी शेअर करायची आहे. चला तर मग वाचा: एकतर्फी प्रेम कविता. ( Crush Love poem ) One Side Love Poems
1
तुला त्याची किंमत नसेल पण आशा नसताना लढण सोप नसत ग!! तुझ्यासाठी प्रत्येक विनोद असेल पण एक तर्फी प्रेम करण सोप नसत ग!! तासन तास तुझ्या एका नजरे ची वाट पाहण् एक झलक मिळाली की जस देव पावन चुकून हसलीस की वेडच होऊन जान मग रात्र काय आणि दिवस काय झोपेच काम फक्त जागत राहन मग मनाला खुळे ठरवून सारा दोष त्याच्यावर ढकलून स्वताची समजूत काढण सोप नसतं ग… !! तुझ्याच विचाराने डोक घुटालनं एका स्वप्नाच्या मागे बाकी सगली ध्येय अर्पण करण एक आशे मागे जीव कुरवाळण… आनंदाचे स्तोत्र तूच रागाचे कारण तूच विचारातहि तूच स्वप्नातहि तूच ध्येयात हि तूच एक मात्र आशा त्या आशेतही तूच मग एकांतात हि एकट राहन सोप नसतं ग..!! डोंगर एवढे स्मित हास्य ओठांवर झेलण मेफिलींच्या गर्दीत लोकांच्या गराड्यात एकटे राहणे एकांतात स्वतःची सोबत नकोशी वाटण मनाच्या जखमांना स्वताच दगडाने ठेचण अश्रू संपे पर्यंत रडण आणि अश्रू हि सोडून गेल म्हणू पुन्हा जीव तोडण सोप नसतं ग…!! पोहता येत नाही म्हणुन पाण्याची ओढ असण विझली तर चटके नही बसणार या आशेन आगीतच उभी राहन कळेल ग तुला अवघड असत प्रेम करण कोणाची जबरदस्ती होती का या प्रश्नाला वारंवार टाळण पण जबरदस्ती नसतानाही स्वतःची आहुती देण सोप नसतं ग…!! तुला त्याची किंमत नसेल पण आशा नसतानाही लढन सोप नसतं ग… तुझ्यासाठी फक्त एक विनोद असेल पण एक तर्फी प्रेम करण सोप नसतं ग…!!
एकतर्फी प्रेम कविता
2
लपून लपून तिला पहावं तिला पाहण्यासाठी झुरावं तिच्या एका नजरेसाठी मरावं अन् तिन पाहताच स्वतःला लपवावं आम्ही प्रेम असच करावं तिच्याशी बोलण्यासाठी तडफडावं बोलायला गेल्यावर शब्द ही न सुचाव आम्ही नेहमी मूक होवून जावं मुक्यानेच तिच्यावर प्रेम कराव आम्ही प्रेम असच कराव ती जात असलेल्या वाटेवरून जावं तिच्या पाठमो-या आकृतीला पहावं तिने मागे वळता आम्ही वळावं काही न बोलताच निघून जावं दुसर कोणीतरी तिला पटवावं तरी आम्ही मूक रहावं त्यान अन् तिन बागेत फिरावं आम्ही पुतळ्यासारख नुसत पहावं
3
ती निघून गेल्यावर तडफडत रहावं🧚 तिच्याच आठवणीत गढून जावं 🥰 तिच अन् त्याच लग्न ठरावं🫂 तिच्या लग्नात आम्ही अक्षदा वाटावं👰 तिन आणि मी एकदा भेटाव 🫂 सोबत तिच्या तिच बाळ असावं त्याने आम्हास मामा म्हणावं हजार कमानी घुसल्या सारख वाटावं खूप दिवस असच तडफडावं एक दिवस दुसर पाखरू दिसावं त्याच्यावर माझ आमच प्रेम जडावं पुन्हा आम्ही प्रेमात पडावं.
एकतर्फी प्रेम कविता | Ektarfi Prem Kavita
4
तुला पाहता मी मोहरून गेलो तुझ्या त्या नरेत हरवून गेलो तुला पाहता सारे विसरून जातो तू माझी होण्याची मी स्वप्न पाहतो.. डोळे मिटले कि तूच दिसतेस् प्रत्येक ठिकाणी जणू तूच असतेस जिथे जावे तिथे तुझा भास होतो तू माझी होण्याची मी स्वप्न पाहतो.. स्वप्नात माझ्या नेहमी तूच येतेस न म्हणता कशी माझी होऊन जातेस हे स्वप्न आहे हेच मी विसरून जातो तू माझी होण्याची मी स्वप्न पाहतो… तुझा प्रत्येक शब्द माझ्या मनी दाटते तू निघून जाण्याची मज भीती वाटते असा अविचार मनी माझ्या येतो तू माझी होण्याची मी स्वप्न पाहतो…
One Side Love Poems
5
माझ्या या नजरेची भाषा तुला कळता कळेना, काय चाललाय हा खेळ मन जुळता जुळेना, माझ्या या वेड्या मनाला वेड का तुझे लागावे, तू होणार नाहीस माझी या वेड्या मनाला कुणी सांगावे, तू आहेस माझी स्वप्न परी, नाही भाळलो फक्त तुझ्या रुपावरी, फुलनार्या फुलाला घेऊन जाईल कुणीतरी, मी मात्र तसाच राहील वाऱ्यावरी, येतील तुझ्या आठवणी एक एक करूनी, ढाल हास्याची करूनी मन जळतय आतुनी, फुलांचा गंध साठवून ठेवते मधुराणी, तसाच तुझ्या प्रीतीचा गंध ठेवला आहे जपुनी , माझ्या या नजरेची भाषा तुला कळता कळेना, काय चाललाय हा खेळ मन जुळता जुळेना, माझ्या या वेड्या मनाला वेड का तुझे लागावे, तू होणार नाहीस माझी या वेड्या मनाला कुणी सांगावे…!!!
6
मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं, पण तरी ते तुलाच शोधत होतं, तुला खरच ओळखता नाही आलं, ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं.
Crush Love poem | एकतर्फी प्रेम कविता
7
आज तर मला खूप काही सांगायचं खरी सुरवात तेव्हा झाली जेव्हां तुझी आठवण आली आली तुझी आठवण पाहून चमकत्या तऱ्याना वेड लावले होते माझ्या सहित साऱ्यांना कळलेच नाही तुला की मी तुझ्याच धुंदीत असायचो लवकर येऊन देखील मुदाम शेवटच्या बाकावर बसायचो त्याच बाकावर दोघांचं नाव मी कोरल तेवढंच मानला समाधान सोंदर्य ही लाजेल इतके लोभस होत हासन तुझ श्रृंगार वीणा ही गोंडस होत दिसण तुझ मुलींच्या त्या गर्दीमध्ये सतत मी तुला शोधायचो तुझ्याबद्दल गमतीशी तासन् तास बोलायचो खरच या प्रेमाचा छंदच वेगळा बेधुंदीचा गंधच वेगळा कारण छंद लागला तुला पाहण्याचा प्रयत्न तुझ्या मनात जाण्याचा.