Marathi Ukhane for Male नावरदेवासाठी
तो दिवस असो ( marathi ukhane for male ) जेव्हा दोन जीवांच्या मिलनाचा
नाहीतर असो मंगलदिन शुभ कार्याचा..: आता न विसरता घ्या फक्त आमचे मजेदार उखाणे.
1
काचेच्या वाटीत गाजरचा हलवा, नाव घेतो माझ्या….ला बोलवा…
|
2
रस्त्यावर गाड्या धावतात फास्टच फास्ट आता…च माझी फस्ट न लास्ट.
|
3
आंब्यात आंबा. हापूसचा आंबा… च नाव घेतो, आता थोड थांबा.
|
4
दिव्यामध्ये नेहमी पेटत असते वात.. बरोबर लवकरच घेणार आहे फेरे सात.
|
5
इंद्रधनुष्य दिसते जेव्हा.पावसात असते ऊन… च नाव घेतो बनवुन तिला…. ची सुन.
|
6
गरमीमध्ये सगळ्यांना हवा असतो थंड थंड वारा…..अन् थंड वारा जिवनात आल्यापासून झालाय आनंद सारा.
|
7
समुद्रात येत असतात अथांग लाटा… बरोबरच चालायच्या आहेत जीवनाच्या सर्व वाटा.
|
8
काचेच्या डिश मध्ये माव्याचे पेढे..…. सोडुन बाकी सगळे
वेडे..
|
9
पाण्यात घागर बुडताना आवाज येतो बुडबुड….. च नाव घेताना, कशाला करता तुम्ही लुडबुड.
|
10
दुधाच दही, दह्याच लोणी, लोणीच तुप अन ***** च माझ्यावर प्रेम खुप..
|
11
चांदीच ताट त्यात सोन्याची वाटी……सोबत थाटतो साता जन्माच्या गाठी..
|
12
निळ्या निळ्या आकाशात चमचमते तारे…… च नाव घेतो, लक्ष द्या सारे.
|
13
फिरायला जायला तयार होतो मी झटकन…..च नाव घेतो, तुमच्यासाठी पटकन.
|
Marathi ukhane ~मराठी उखाणे
14
हिवाळ्यात धुके पडते दाटच दाट.. …..च नाव घेतो, आता सोडा माझी वाट.
|
15
आकाशात उडतोय पक्षांचा थवा…… च नाव घ्यायला उखाणा कशाला हवा..
|
16
झुळझुळणाऱ्या वाऱ्यावर मंद चाले होडी……आयुष्यभर सोबत राहो ची जोडी..
|
17
वेड्याला इंग्रजीमध्ये म्हणतात सायको…… च नाव घेतो, बनवून तिला बायको.
|
18
कोकणामध्ये प्रसिद्ध आहेत आंबा, फणस, काजू…..च नाव घ्यायला, मी कशाला लाजू.
|
19
प्रेमाच्या या प्रवासात घट्ट जुळलय मन.. …आता च माझी वन अँड ओन्ली वन.
|
20
घराच्या अंगणात गुलाबाच फुल….. अन् माझी जोडी सुपर कुल…
|
21
शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे काशीला….. च नाव घेती सगळे जण आहेत साक्षीला..
|
22
निरभ्र आकाशात, चंद्राची सुंदर कोर….. चे नाव घेतो, भाग्य माझे थोर.
|
23
चंद्राला पाहून चांदणी गोड लाजली.. ची जोड़ी साऱ्या अन् जगाला भाळली.
|
नावरदेवासाठी उखाणे ( एकदम नवीन उखाणे )
24
ऊन-पाऊस, ऊन-पाऊस, असा चाललाय निसर्गाचा खेळ……. आता बरोबर जुळलाय आयुष्यभराचा मैळ..
|
25
पाऊस लागला की कोकिळा गाते गोड अन.. …ला भेटायची मला लागली आहे ओढ.
|
26
प्राचीन भारतात होत्या सोन्याच्या खाणी…..च नाव घेतो मी तिचा राजा अन् ती माझी राणी.
|
27
अंगणात पडले आहेत पारिजातकाचे सड़े…..च नाव घेतो, सर्वांनी लक्ष द्या इकडे.
|
28
पांढरा शुभ्र रंग शोभून दिसतो सशाला, अन्…..च नाव घ्यायला आग्रह कशाला.
|
29
पुण्याला जाताना लागतो लोणावळा घाट अन……सोबत बांधतो आयुष्याची गाठ.
|
30
नाव घ्या नाव घ्या असा घालू नका वाद….च नाव घेऊन मिळविन सगळ्यांची दाद..
|
31
झपाटलेला मुव्ही मध्ये प्रसिद्ध व्हिलन होता खविस खूबड्या, अन् शुभ्राच नाव घेतो आईचा लाडका बबड्या..
|
32
Abhi’s Kitchen च नाव सर्वत्र गाजे, आसावरीच नाव घेतो मी अभिजित राजे.
|
33
नाव घ्या नाव घ्या असा करू नका गजर….. ला पाहता क्षणी मनात वाजला बझर..
|
34
नाव घ्या नाव घ्या असा करू नका गजर.. …आणि ला बघताच घायाळ माझी नजर..
|
35
नाव घ्या नाव घ्या असा करू नका गजर, आमच्या जोडीला लागेल तुमची प्रेमळ नजर..
|
36
नाव घ्या नाव घ्या असा करू नका गजर.. …च नाव घेतो मी तिचा चहा अन् ती माझी शुगर.
|
37
महाभारतामध्ये कौरव होते शंभर… ..अन् माझी सर्वात एक नंबर.
|
38
जुईच्या वेलीवर लागली सुगंधी नाजुक फुले अन्…
चा चेहरा नेहमीच हसुन खुले.
|
39
प्रेमाच्या या प्रवासात पास केल्यात सर्व टेस्ट….. च नाव कस घ्यायच, ती आहेच एकदम बेस्ट.
|
40
खूप साऱ्या दिवसांपासून सारखा होतो तुझ्या मागे हे देवा, असेच सदैव राहुदे….. आणि माझे जन्मोजन्मीचे धागे.
|
41
राजा-राणीच्या या खेळात तिने केलय मला चेकमेट… च नाव घेतोय, कारण ती आहेच खूप ग्रेट.
|
42
नाशिक म्हटलं की सगळ्यांना आठवते Sula Wine.. अन्…….च नाव घेतो, She Is Forever Mine.
|
बेस्ट नवीन मराठी उखाणे नावरदेवासाठी
43
अश्विन शुद्ध प्रतिपदेला बसतात देवीचे घट, अन्, नाव घेऊन देवीला सांगतोय लवकरच होऊ दे कोरोनात
घट,
|
44
रेल्वे ला मराठीत म्हणतात आगगाडी…….ला शोभून दिसते राखाडी रंगाची साडी.
|
45
Grey रंगाला मिळालाय आजचा पाहिला मान.. नाव घेते चला की मग सगळे मिळून करूया नवरात्र उत्सवात देवीचे गुण गाणं.
|
46
सूर्याची किरणे असतात नारंगी नारंगी…..भेटले तेव्हा पासून आयुष्य झालंय रंगेबिरंगी..
|
47
आजचा कलर आहे orange, मी आणि…. ने देवीपुढे घेतला लग्नाचं challenge..
|
48
….नी घातलाय केशरी रंगाचा फेटा, Lockdown संपल्यावर नक्कीच तुम्ही भेटा..
|
49
आजचा रंग आहे पांढरा मी…** चा बबड्या आणि ही माझी शुभ्रा.
|
50
निळ्या भोर आकाशात पांढरे पांढरे ढंग….सोबत मला फिरायच आहे सार जग.
|
51
प्रेमात पडलो तेव्हा नेसून आली होती साडी लाल..
शी करून लग्न करून घेतले जेवणाचे हाल.
|
52
हिरव्या हिरव्या मेहंदीचा रंग चढलाय लाल.. …च नाव घेतो, उधळून मी गुलाल.
|
53
निळ्याशार समुद्राचा लागत नाही तळ…. सोबत स्वप्न पूर्ण करण्यात मिळू देत बळ.
|
54
निळ्या निळ्या आकाशात उडे पक्षांचा थवा…… आयुष्यात आले. तेव्हा पासून जगण्याला मिळालाय अर्थ नवा..
|
55
नवरात्रीचा दिवस पाचवा, रंग आहे ब्लू अन्…. ने जास्त बडबड केली तर लावेन तोंडाला glue.
|
56
आज नवरात्रीचा दिवस सहावा, रंग आजचा Yellow.. ****नाव घेताच Melt Like Marshmallow..
|
57
पिवळ्या धम्मक साडीची दिली मी तिला भेट, अन….. साठी कायम खुल माझ्या मनाचं गेट.
|
58
झेंडूच्या फुलांचा पिवळा असा रंग, Mirzapur Season 2 बघायचाय.मला फक्त ……संग
|
59
महाष्टमी आहे आज आणि रंग श्री कृष्णाचा आवडता मोरपंखी, आशीर्वाद असावा ह्या ब्रम्हांडचा आणि जोड़ी शोभुदे जणू पार्वती अन् अर्धांगी.
|
60
Parrot Is Green, Parrot is, Green.. ……च नाव घेते कोरोनाच्या उद्घाटनाने दणाणले Chin..
|
61
रिमझिम पडणारा पाऊस, अन् हिरवागार मळा.. …..च्या आपुलकीचा मला लागलंय लळा.
|
62
महाष्टमी आहे आज आणि रंग श्री कृष्णाचा आवडता मोरपंखी, आशीर्वाद असावा ह्या ब्रम्हांडचा आणि जोड़ी शोभुदे जणू पार्वती अन् अर्धांगी.
|
Ukhane in marathi for male नावरदेवासाठी उखाणे
63
आज आहे अष्टमी, रंग आहे मोरपिशी…….च नाव घेतो, जोड़ी आमची साजिशी.
|
64
आज आहे अष्टमी, रंग आहे मोरपिशी. ….च नाव घेतो, जोड़ी आमची साजिशी.
|
65
वांग्याचा कलर असतो Purple,
माझ्या अन्,….च्या प्रेमाचा असच वाढू दे Love Circle.
|
66
कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र दिसतोय गोल गोल अन् ….च नाव घेतोय, जोडी आमची अनमोल..
|
67
निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई….च नाव घेऊन, घरात जायची मला लगली आहे घाई..
|
68
कोरोनाच्या या महामारीत केलंय आम्ही लग्न आता ..
…..बरोबर संसारात होईन मी मग्न.
|
69
साखरपुड्याची साखर सर्वांना वाटली अन….. च नाव घ्यायला, मला लाज नाही वाटली.
|
70
सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे बनली आहे सूर्यमाला अन…..च नाव घेतो घालून तिला वरमाळा.
|
71
लक्ष्मी-नारायणाला साजेसा जोडा आहे आमचा.. …च नाव घेतोय, अनु आशीर्वाद असुदे तुम्हा सर्वांचा.
|
72
चौपाटीवर बसून बघायला आवडते समुद्राची लाट….. बरोबर लग्न करायची, आतुरतेने पाहत होतो मी वाट.
|
73
धनत्रयोदशीला करतात धनांची पूजा…. माझी राणी, अन् मी तिचा राजा.
|
74
खुसखुशीत अस झाल आहे करंजीच सारण…..च नाव घेतोय, दिवाळी सणाच्या कारण.
|
75
नाही नाही म्हणता जुळले आहे मन.. … बरोबर साजरा करतोय दिवाळीचा सण..
|
76
दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे पाडवा अन्…….. च्या सहवासात मिळुदे सदैव गोडवा.
|
77
भाऊबीज म्हणजे भावा बहिणीच्या प्रेमाची खुण.. ….. शी लग्न झाले, थोर भाग्य कुठले याहून..
|
78
लक्ष लक्ष दिव्यांसारखे उजळत राहो आमचे प्रेम…. ने माझ्या हृदयात कोरली प्रेमाची सुंदर फ्रेम.
|
79
जिथे सुख,शांती,समाधान तिथे लक्ष्मीचा वास अन्. …
… सोबत सुरू केला जीवनाचा प्रवास.
|
80
डुलत होती तुळस घरच्या अंगणात.. बरोबर संसार फुलवेन आमच्या वृंदावनात..
|
81
घरासमोर शोभते तुळशी वृंदावन अन्……. सोबत फुलवेन सुखाच नंदनवन..
|
82
दाट धुक्याबरोबर गुलाबी थंडीला आलाय बहार…
… च्या सोबतीने लिहीन, आयुष्याचा सुंदर असा सार..
|
83
Sulphuric Acid चा फॉर्म्युला आहे h2so4. माझ्या अन् ……. च्या लग्नाचा सगळीकडे होऊदे शोर..
|
Marathi ukhane for groom | नवीन उखाणे
84
संपूर्ण जगात सध्या चालू आहे कोरोनाचा Duration.. तरी पण बरोबर……. जुळले माझे Chemical Equation..
|
85
कोकणात जन्माक येऊक नशीब लागता थोर.. अन् जन्माक येऊन जेचो आसा सगळीकडे शोर तोच मी कोकणचो येडो पोर..
|
86
पोस्ट्स माझे असतत नवीन, कारण आसयच मी येगळो.. अन् रोज तुमका हसवणारो.. मीच तो कोकणातलो खुळगो..
|
87
पेजच्या सुरुवातीपासूनच तुमचा आमचा चांगला चाललंय Relation. अन् तुम्हाला नेहमीच हसवणारा मीच तुमचा लाडका Moody Creation..
|
Marathi ukhane list
88
पेज काढल्या पासना फेमस झालय इतको .. अन् रोज तूमका खूप हसवणारो मीच तुमचो मालवणी सातको..
|
89
हिरव्यागार झाडी पासून ते निळ्याशार समुद्रापर्यंत पसरलाय कोकणचा पट्ट.. अन् हाच पट्टा पोस्ट्स द्वारे फिरवायला घेऊन आलीय मी कोकणचा कट्टा..
|
90
खुपवेळा व्यक्त करायचे राहून जातात भाव माझ्या मनातले.. अन् त्याचे भावना व्यक्त करण्यासाठी घेऊन आलीय मी शब्द माझ्या मनातले..
|
91
तुम्हा सगळ्यांसाठी कोकण समजून घेण्यास माझ पेज नक्कीच ठरेल Beneficial.. कारण पोस्ट्सद्वारे कोकण समजवणारा मीच तुमचा
Kokani Mulga
|
92
कोकण म्हटलं की नाव समोर येत ते भगवान श्री परशुरामांच.. अन् त्यांच्या आशीर्वादाने जपुयात कोकण तुमचं आमचं..
|
93
स्वर्गाहूनी सुंदर असा कोकण नेहमी वसे सर्वांच्या ध्यानीमनी…अन् त्याच स्वर्गात राहणारे नशीबवान असे आम्ही मालवणी.
|
94
भरजरी वस्त्र अंगावर परिधान करून आणि दागदागिन्यांनी नटान रंगभूमीवर केले जातत वेगवेगळे अवतार..अन् हेच अवतार आता साता-समुद्रापार पोचवणारो मी तुमचो लाडको कोकणचो दशावतार..
|
95
सगळ्याका पुरान उरतय कारण आसयच मी दांडगो.
अन् रोज पोटभर हसवणारो मीच तुमचो कोकणातलो पांडगो..
|
96
चार बाजूला चार केळी बांधून पूजिला श्री देव सत्यनारायण अन.. …… साठी करेन दहा दिवसांचे भक्तिभावाने पारायण.
|
97
सायंकाळच्या प्रहरी देवासमोर नेहमी करावी सांजवात तुम्हा सर्वांच्या साक्षीने…… बरोबर घेतोय सप्तपदीचे फेरे सात..
|
98
सणासुदीला छान शोभून दिसतो मराठमोळा साज अन्……… … च सौंदर्य करते माझ्या मनावर राज.
|
99
कळी सारखे उमलावे, फुला सारखे फुलावे……. च्या सानिध्यात, आयुष्य माझे खुलावे..
|
100
निशिगंधाचा सुगंध जागोजागी दरवळला,…..च्या सोबतीत जीव माझा सुखावला.
|
Ukhane navardevasathi
101
सरत्या वर्षाला निरोप देत, नवी वर्षात घेऊया उंच उंच भरारी अन्….. च्या साथीने आयुष्याला येईल नवी उभारी..
|
102
जीवनाच्या वेलीवर प्रेमाच फुल कधी उमलले हे कळलंच नाही आणि.. ….चा मी कधी झालो, हे समजलंच नाही..
|
103
गुलाबी थंडीचा गारवा, हळू हळू वाढतोय अगदी जोमाने आणि…… च्या प्रेमाचा गोडवा, बहारतोय पुन्हा नव्याने..
|
104
क्षणांमध्ये झाली ओळख आणि हळू हळू आपुलकी झाली कायमची.. अन् …. .च्या सहवासात खरी नाती बनली आयुष्यभराची.
|
105
तुझ्यातील प्रेमळ स्वभावाला अन नजरेतील नजाकतीला कशाचीही तोड नाही अन मला आता … शिवाय
दुसर्या कोणाचीही ओढ नाही..
|
106
मालवणी माणसाच्या जेवणात तुमका कायम दिसतला माश्याचा सार अन्. ……..चा नाव घेऊक, माझ्यावर नाय कसलो भार..
|
107
गावाकडची जत्रा म्हटली की सगळ्यांका पहिला आठवता ता मालवणी खाजा.. …….बरोबर लगीन करून आणि
आयुष्य सुखी होईत माझा..
|
108
जगाच्या खयल्याव कोपऱ्यात गेलास तरी तुमका रसाळ अशी मालवणी ऐकाक गावतली अन् आंगणेवाडी….. ची भराडी देवी ची जोडी कायम सुखी ठेवतली.
|
109
आई-वडिलांच्या प्रेमाची सर, कधीच येत नाही कोणाला.. …..च नाव घेईन, तुम्ही सांगाल त्या त्या वेळेला..
|
110
पानांची सावली, फळांची गोडी, तसाच फुलांचा सुगंध अन् …….. च्या सहवासात झालोय मी धुंद.
|
111
साखरपुडा पार पडला, आता लग्न करू आम्ही अगदी जंगी……. च नाव घेईन, पुढे येणाऱ्या प्रत्येक शुभ प्रसंगी.
|
112
मनमोहक असा सुगंध पसरवत होती मोगऱ्याची फुले.. अन् …….च नाव घेताच, मन माझे आसमंत भरून डूले.
|
113
जरी अनोळखी होतो आपण, तरी बनलो होतो एकमेकांसाठी अन् …… सोबत लग्न करून, झालो आम्ही एकमेकांचे जीवनसाथी..
|
सुंदर उखाणे
114
आमच्या प्रेमाच्या नात्याला आशीर्वाद हा तुमचा हवा अन् त्याच आशीर्वादाने…….. बरोबर थाटेन संसार नवा नवा.
|
115
हृदयरुपी मंदिरात आहे, श्री गणराया तुझीच रे मूर्ती.. अन् तुझ्याच कृपादृष्टीने, आम्हा सर्वांना मिळते जगण्याची स्फूर्ती..
|
116
दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही पेट्रोल आणि डिझेल महागले.. अन्……. च्या रुपात अनमोल असे रत्न माझ्या नशीबी लाभले..
|
117
ना सोन्या-चांदीची अपेक्षा, फक्त आहे सुख-समाधानाची इच्छा… माझ्या अन……. .च्या संसाराला असाव्यात, तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा.
|
छत्रपती शिवाजी महाराज उखाणे
118
सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात हिंडताना आज ही नाद घुमतोय तो माझ्या छत्रपतींच्या नावाचा.. अन् आपलं हिंदू राष्ट्र अखंड ठेवण्यासाठी सदैव आशीर्वाद असेल तो फक्त माझ्या शिवरायांचा…
|
119
पंढरपुरात चंद्रभागेच्या तिरी बसलाय माझा विठोबा सावळा. अन् …….च नाव घेतोय, मी शिवरायांचा मर्द मराठा मावळा…
|
Smart marathi ukhane
120
कोकणामध्ये आता चालू होईल आंबे, फणस, काजुचा Season.. अन्………. च नाव घ्यायला, मला लागत नाही कोणतं Reason..
|
121
लग्न सोहळा पार पडला, वरात आली वाजत गाजत.. अन्….. च नाव घ्यायला, मुळीच नाही मी लाजत..
|
122
तुझ्या प्रेमळ स्वभावामुळे, विसर पडतोय दुःखाचा.. ….बरोबर लग्न करून, संसार करेन मी सुखाचा…
|
123
लग्न मंडपात अक्षता पडल्या, शुभ मुहूर्ताच्या वेळी…….. च नाव घेऊन, संसाराची थाटात सुरुवात केली..
|
124
जीवनातील आनंद वाढवत जाऊ, आणि दुःख करत जाऊ,वजा, आता…… च्या सहवासातच करेन, पुढील आयुष्याची खरी खुरी मजा..
|
125
महाराष्ट्रामध्ये कोकणचे पंढरपुर म्हणून आहे आंगणेवाडीची ख्याती.. अन् श्री देवी भराडी मातेच्या दर्शनाने होऊदे, सर्व भक्तांना सुख-समृद्धीची प्राप्ती..
|
126
बाजूला निळाशार समुद्र अन् रेखीव शिवलिंग असलेले कुणकेश्वर आहे दक्षिण कोकणची काशी… अन् हे शिव शंभू साऱ्या भक्तगणांचे सुख लपलय ते फक्त तुझ्याच चरणापाशी..
|
127
तुझ्या माझ्या प्रेमाच्या प्रवासात मोह, माया कसलीच नसावी.अन् आयुष्यातील पुढील प्रत्येक क्षणांची सोबत ही फक्त…. चीच असावी.
|
Marathi ukhane funny (comedy ) For male ~
128
गोव्याहून आणले काजू
ऐकलं का
गोव्या हून आणले
काजू अन्
हीच्या थोबाडित द्यायला
मी का बरं लाजु
|
129
डाळित डाळ तुरीची डाळ
👍👍डाळीत डाळ ती फक्त तुरीची डाळ👍👍
आता बघाचं कसं खेळवतो हिच्या मांडिवर
एका वर्षात बाळ
|
130
MSEB च्या तारेवर टाकले होते आकडे…
@MSEB च्या तारेवर टाकले होते आकडे…
अजून लग्नच माझ नाही ठरलयं
तर व कोणाच घेऊ गं माकडे
|
131
पावाबरोबर खाल्ले अमूल बटर…
👉पावाबरोबर खाल्ले
अमूल बटर…
हीचं नाव घ्यायला
अडलय माझ खेटर…
|
132
उभा होतो मळयात, नजर गेली खळयात…
☺️ उभा होतो मळयात, नजर गेली खळयात…
नवरत्नांचा हार घालेल ते पण फक्त हीच्याच गळयात….
|
133
नांदेड ते औरंगाबाद वाटेत पेरला लसूण….
नांदेड ते औरंगाबाद वाटेत पेरला लसूण….
आणि
ह्यांच्या बहिणी लग्नाला आल्या ते पण गाढवावर बसून….
|
134
बशीवर बशी डबल बशी
ऐका आता बशीवर ती झाली डबल बशी
अन तिला सोडुन बाकीच्या झाल्या आता संगळ्याच म्हशी….
|
135
खोक्यात खोका अगरबत्तीचा खोका..
ऐका खोक्यात खोका अगरबत्तीचा खोका…
नाही नाही म्हणता हिने पण
कापून खाल्ला की बोका….
|
136
घेतला पाव शेर रवा तर घेतला पाव शेर खवा….
@ घेतला पाव शेर रवा तर घेतला पाव शेर खवा…
Quarantine मध्ये माझी ही म्हणते
धनी आज रात्र भर……
|