आंबडीच्या पानांची तिखट चटणी – गावरान पद्धतीने

आज आपण गावरान पद्धतीचा  चटपटीत म्हणजे तिखट तरीही अंबड अंबाडीचां ठेचा किवा चटणी करतोय, करायला खूप सोपं आहे. फक्त तेल टाकून भाकरीसोबत खायला खूप छान लागतो.

सगळ्यात महत्त्वाचं एकदा करून ठेवल्यानंतर 5-6 दिवस फ्रिजशिवाय आरामात टिकतो. चला करुया आज आपण आंबट आणि तिखट चवीची अंबाडीची चटणी करतोय. अंबाडीच्या भाजीपासून खर तर अंबाडीच्या नावामध्येच आपल्याला कळतं की ही थोडीशी आंबट असणार आहे.

तर अंबाडीच्या भाजीची चटणी केली जाते. अंबाडीचं लोन च केलं जातं. अंबाडीची गरगट्टी केली जाते. 

अंबाडी बराच काही पदार्थांमध्ये आंबटपणासाठीसुद्धा वापरली जाते तर त्याच अंबाडीच्या भाजीची आपण मस्त चटणी करतोय अशी चटणी जीला फक्त पाच ते सहा साहित्य लागतं आणि ही चटणी आठ दिवस आरामात टिकते. फ्रिजशिवायसुद्धा टिकते करायला खूप सोपी आहे तर त्यासाठी इथे मी अंबाडीची एक जुडी घेतली. चटणी करण्यासाठी किंवा गरगठी  करण्यासाठी अंबाडीची फक्त पानं घेतले.

चटणी करण्यासाठी तुम्हाला खालील साहित्य लागेल:

  1. अंबाडीच्या पानांची एक जुडी
  2. 2-3 चमचे तेल
  3. 1 चमचा जिरा
  4. 15-20 लसूणाच्या पाकळ्या
  5. 6-7 तिखट हिरव्या मिरच्या (आवडीनुसार कमी-जास्त)
  6. मीठ (चवीप्रमाणे, अंदाजे अर्धा चमचा)
  7. 2 चमचे कच्च्या शेंगदाण्याचं तेल (वैकल्पिक, चटणी टिकवण्यासाठी)
  8. 2 चमचे दाण्याचा कूट (वैकल्पिक, चटणी लगेच वापरण्यासाठी)

कृती 

१) तर बघा अंबाडी खालील फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे असते. आकारामध्ये अशी थोडीशी काटेरी आणि अशी टोकदार पाने असतात. अंबाडीची शक्यतो पाने घ्या.

अंबाड्याची पान
अंबाड्याची पान

२) ही अंबाडी पान स्वच्छ धुवून घ्यायची तरी तुम्ही अंबाडी स्वच्छ धुऊन चाळणीवर पाणी निघून जाण्यासाठी ठेवा. 

३) आता भाजी करण्यासाठी तुम्ही लोखंडाची कढई गरम करायला घ्या. लोखंडी कढई असेल तर उत्तम नसेल तर दुसरं कोणतंही भांड तवा वापरा मला आठवते. पूर्वी भाकरी केले की त्याच्यामध्ये तसे  खोलगट तवे असायचे. लोखंडाचे त्याच्यामध्ये अंबाडीची भाजी फोडणी घातली जायची आणि तव्यावरच रगडली जायची. आता माझ्याकडे तितका खोलगट तवा नाही म्हणून मी कडई घेतली.

४)  यामध्ये घालायचे दोन ते तीन चमचे तेल थोडा जास्त घालायचं हे तेल चांगले तापून घ्यायच आणि यामध्ये घालायचे एक चमचा जिरा यामध्ये फार साहित्य पडत नाही. 

५) त्यामुळे जर चांगलं फुलून द्या असं कच्चा राहिला तर कडवट लागतं. जीरा चांगला फुलुद्या आता यामध्ये घालायच्यात 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि सहा ते सात तिखट हिरव्या मिरच्या. तुम्ही मिरची आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पण शक्यतो तिखट मिरची वापरा. 

अंबाडी चटणीसाठी फोडणी

६) आता याला चांगलं परतून घ्यायचे. लसूण आणि मिरची असे चांगले डार्क कलर लागेपर्यंत परतायचे. लसूण मिरची छान परतले यामध्ये घालायची अंबाडीची भाजी  आता भाजी घातली आता त्याला चांगल परतून घ्याच.

अंबाड्याची पान तव्यामधे
अंबाड्याची पान तव्यामधे

७) भाजी चांगली अशी बसेपर्यंत कमी होईपर्यंत चांगली अशी परतू लगेच मिठ घालू नका जर घातलं तर मिठाचा अंदाज चुकू शकतो तर ही भाजी पण चांगली परतून घेतली आणि  आता भाजी चांगली बसलेली म्हणजे ती बरोबर क्वांटिटीमध्ये आलेली आहे.

अंबाड्याच्या चटणीसाठी पानं शिजवून घेतले

८)  आता यामध्ये घालायचे चवीपुरते मीठ अगदी अर्धा चमचा मीठ घातलं आणि याला  झाकण न ठेवता असं भाजितल पाणी कमी होईपर्यंत एक 3-4 मिनिटे मोठा गॅसवर परतून घ्या  मोठय़ा गॅसवर तीन ते चार मिनिट भाजी चांगली परतली.

९) आता पाणी सगळं आटवून घ्या आता जे दिसते ते सगळं तेल आहे गॅस बंद करायचा. आता जर तुम्ही लोखंडाच्या तव्यामध्ये करता तर इथं काय करायचं या भाजीला तांब्या च्या पेल्याने ने रगडून घ्यायचं. म्हणजे मग आपली चटणी तिथेच तयार होते. 

१०) पण आता माझ्याकडे कढई आहे म्हणून  त्यामुळे मी याला एका ताटलीमध्ये काढून पूर्ण थंड करणार आहे किंवा तुम्ही अस ही करू शकता. भाजी काढा संपूर्ण थंड करा आणि मग खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ शकता.

अंबाड्याची चटणीसाठी पाणी शिजवून बाहेर काढून घेतले

११) मी ही मिक्सरमधून बारीक करणार आहे तर आपण ही भाजी काढून घेतली. भाजी पूर्ण थंड करून घेऊ तर आपली ही भाजी आता पूर्ण थंड झालेली आहे. याला पाणी न घालता मिक्सरमध्ये थोडं फिरवून घ्यायचा फार अगदी बारीक वाटायचं नाही किंवा तुम्ही थंड झाल्यानंतर खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ शकता तर इथे आपल्या  मिक्सरमधून वाटून घेतले.

सर्व पाने मिक्सरला लावून घेतली

१२) अगदी मी 2 ते 4 सेकंद मिक्सर फिरवला, फार बारीक करू नका. तुम्हाला बारीक करायचा असेल तर चालेल काहीच प्रॉब्लम नाही. 

१३) त्याच्यावर तुम्ही दोन चमचे कच्च्या शेंगदाण्याचं तेल घालायचं. कच्चे तेल घातल्यामुळे काय होतं? चटणी खूप जास्त दिवस टिकते किंवा तुम्हाला वाटते तेल नाही घालायचं तर तुम्ही फ्रिजमध्ये ठेवा किंवा अशी ठेवली तरीसुद्धा टिकते. आता जर तुम्हाला चटणी लगेच खायची आहे किंवा दोन दिवसात संपायची तर यामध्ये दाण्याचा कूट घालू शकता तर इथं मी दोन चमचे दाण्याचा कूट घातलाय.

१४) पण जर तुम्हाला  चटणी खूप दिवस टिकवायची फ्रिजशिवाय तर दाण्याचा कूट घालू नका. ऐनवेळी खाताना कुट आणि तेल घेऊन खा त्याला मिसळून घ्यायचे.

१५)   शेंगदाण्याचा कूट आणि तेल घालून याला मिक्स करून घेतले आहे. आणि हे बघा आपली ही अंबाड्याची चटणी तयार झाली. मस्त झणझणीत आणि आंबट अंबाडीची चटणी किंवा ठेचा तयार झालेला आहे.

अंबाड्याची चटणी तयार झाली
अंबाड्याची चटणी तयार झाली

आठ दिवस आरामात टिकतो. भाकरीसोबत किंवा तोंडी लावण्यासाठी मस्त लागतो. 

तर अशा पद्धतीने आपला अंबाडीचा ठेचा किंवा अंबाडीची चटणी तयार झाली आहे. जर तुम्ही काचेच्या बरणीमध्ये चांगली कोरडी भरणीच्यामध्ये ठेवली तर फ्रिजशिवाय आठ दिवस टिकते किंवा फ्रिजमध्ये ठेवली तरीही चालते.करून बघा ही रेसिपी खूप छान लागते

Leave a Comment