साध्या आणि स्वादिष्ट साऊथ इंडियन चटणीच्या दोन रेसिपी: उडपी हॉटेलच्या पांढरट चटणी आणि कांद्याची चटणी

उडपी हॉटेलमध्ये डोशासोबत मिळते ना? ती पांढरी चटणी ते आपल्या सगळ्यांनाच आवडते पण घरी करायला गेलं की अगदी तशीच चव जमत नाही. पण आज मात्र त्याची सिक्रेट रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे.

तुम्हाला नक्की समजेल की अगदी तशीच चव असलेली रेसिपी आणि त्याच्यासोबत अजून एक साऊथ इंडियन पद्धतीची कांद्याची डोशासोबत चटणीची रेसिपी शेर करते. म्हणजे काय? जर तुम्हाला तीच ती नुसती नारळाची चटणी खाऊन कंटाळा आलाय तर या दोन नवीन चटणीची प्रकार तुमच्यासाठी करून नकी बघा.तुम्हाला खूप आवडतील. दोन्ही रेसिपीज करायला खूप सोपे आहेत चला करू या.

नमस्कार आज पण इडली डोसा अप्पे उत्तप्पा जे काही साऊथ इंडियन नाश्ताचे प्रकार असतात त्याच्यासोबत खाल्ल्या जाणाऱ्या नास्ट्याचे चटनीचे दोन प्रकार करतोय तसं तर डोसा इडलीसोबत खूप वेगळ्या प्रकारच्यां चटण्या केल्या जातात. टोमॅटोची चटणी असते. शेंगदाण्याची चटणी असते पण आपण शक्यतो नारळाची चटणी करतो तसं तर खूप वेगवेगळे प्रकार आहेत आज मी तुम्हाला. खूप सोप्या नेहमीच्या पदार्थामध्ये चटण्या तयार करुन दाखवणार आहे. सुरुवात करूया तर चटणीचा पहिला प्रकार आपण बघतो ते म्हणजे उडुपी होटलमध्ये इडलीसोबत पांढरट रंगाची चटणी असते ना ती कशी करायची ते आधी बघुयात तर यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी बघू. 

उडपी हॉटेलच्या चटणीसाठी साहित्य:

  1. शेंगदाणे – 100 ग्रॅम
  2. फुटाण्याची डाळ – 50 ग्रॅम
  3. ओला नारळ – अर्धा कप (खरबडलेला)
  4. हिरव्या मिरच्या – 2-3
  5. आलं – अर्धा इंच तुकडा
  6. मीठ – चवीनुसार
  7. मोहरी – अर्धा चमचा
  8. जिरे – अर्धा चमचा
  9. हिंग – पाव चमचा
  10. कडीपत्ता – थोडासा
  11. सुक्या मिरच्या – 2-3
  12. तेल – 2 चमचे
  13. कोथिंबीर – बारीक चिरलेली (फोडणीसाठी)

उडपी चटणीसाठी साहित्य

कृती

१) तर हिते 100 ग्रॅम शेंगदाणे  चांगले भाजून त्यांची साल काढून घेतले.

२) 50 ग्राम फुटाण्याची डाळ घेतलेली त्याच बरोबर अर्धा कप ओला नारळ घेतलाय, नारळ खरबडली आणि त्याचे पातळ काप करून घेतले

३)  दोन ते तीन हिरव्या मिरच्या अर्धा ते एक आल चवीपुरतं मीठ लागेल फोडणीसाठी आपण घेतली अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग थोडासा कढीपत्ता आणि दोन ते तीन सुक्या मिरच्या.

४) आता मिक्सरच्या भाड घेतले त्यामध्ये घेऊयात हिरवी मिरची आल्याचे तुकडे आल्याची साल काढून बारीक कापून घेतलेले.

मिक्सर आणि पदार्थ

५) यामध्ये कोथिंबीर वापरली जात नाही. फुटाण्याची डाळ घालून त्यात भाजलेले शेंगदाणे चवीपुरतं मीठ घालायचे यामध्ये थोड पाणी घालू, आणि याला बारीक वाटून घेऊ

६) तरी बघा याला मी पाणी घालून वाटून घेतले आणि आपली ही चटणी तयार झाली आहे. ही चटणी मी तरी बऱ्यापैकी घट्ट ठेवली. तुम्ही जर उडपी हॉटेलमध्ये गेला तर यापेक्षा पातळ असते. तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करा. इथं ही चटणी वाटण्यासाठी साधारण अर्धा ते पाऊण कप पाण्याचा वापर केला तर आपली चटणी वाटून झाली.

मिक्सरला लावल्यानंतर उडपी हाटेल चटणी

 ७) याची फोडणी करु फोडणीसाठी पातेल्यात घेऊयात. दोन चमचे तेल  तेल तापवा. 

८) यामध्ये घालायची मोहरी, मोहरी तडतडली की गॅस कमी करून जिर घालायचे, हिंग घालूया, कडीपत्ता. आणि लाल सुकी मिरची. 

फोडणी साठी साहित्य घातलेलं

९) गॅस बंद करून, थोडं परतून घेऊन.आताही फोडणी चटणीवर ओतून घ्याची.

१०) फोडणी घातली यावर घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि याला चांगलं मिक्स करून घ्या.

उडपी हॉटेल ची चटणी तयार झाली

तर बघा आपली उडपी हॉटेलमध्ये मिळते तशी अपली पांढरी चटणी तयार झाली. 

साऊथ इंडियन कांद्याची चटणी

आता चटणीचा दुसरा प्रकार बघूया ज्यामध्ये आपण कांद्याचा सुका मिरचीचा वापर केलेला आहे त्याच्यासाठी साहित्य काय लागणार आहे? त्याआधी मग त्यासाठी घेतली एक टेबलस्पून उडदाची डाळ दोन टेबलस्पून हरभऱ्याची डाळ याची , तीन ते चार लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच किंवा एक इंच आलं पाच ते सहा लाल सुक्या मिरच्या अर्धा चमचा हळद चवीपुरते मीठ, एक मोठा कांदा बारीक कापून घेतला.

फोडणीसाठी आपण घेतली अर्धा चमचा मोहरी पाव चमचा हिंग आणि थोडासा कढीपत्ता.

साहित्य:

  1. उडदाची डाळ – 1 टेबलस्पून
  2. हरभऱ्याची डाळ – 2 टेबलस्पून
  3. लसूण – 3-4 पाकळ्या
  4. आलं – ½ इंच तुकडा
  5. लाल सुक्या मिरच्या – 5-6
  6. हळद – ½ चमचा
  7. मीठ – चवीनुसार
  8. कांदा – 1 मोठा (बारीक कापलेला)
  9. मोहरी – ½ चमचा (फोडणीसाठी)
  10. हिंग – पाव चमचा (फोडणीसाठी)
  11. कडीपत्ता – थोडासा (फोडणीसाठी)
  12. तेल – 1-1½ चमचा (भाजण्यासाठी)
  13. पाणी – ½ कप (चटणीसाठी)
  14. कोथिंबीर – बारीक चिरलेली (फोडणीसाठी)

साऊथ इंडियन कांद्याची चटणी कृती 

१)   आता इथं मी एक पातेल ठेवलं. त्यामध्ये घ्यायचे अगदी एक ते दीड चमचा तेल, तेल तापलं की गॅस कमी करायचं. आता यामध्ये घालायचे हरभऱ्याची डाळ उडदाची डाळ.

२) या दोन्ही डाळी आपल्याला मंद आचेवर हलका सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे तर डाळी तर हलका असा मस्त वास येतोय आणि डाळी अशा भाजुन घ्याच्या आता यामध्ये घालायचा कांदा. लसणीच्या पाकळ्या आणि आलं साल काढून घ्यायचाय.

३) आणि यालासुद्धा आता एक थोड्या वेळासाठी किंवा कांदा थोडासा परतून घेऊ पर्यंत परतून होईपर्यंत भाजून घ्या तर कांदा बघा. अगदी 12 मिनिटांसाठी भाजून घेतला. खूप डार्क केला नाही.

४) आता यामध्ये घालूया लाल सुक्या मिरच्या, मिरच्या मी थोड्याशा तोडून घालते. तुम्हाला जर असा रंग अजून छान पाहिजे असेल तर थोडी बेडगी मिरची घातली तरी चालेल. 

चटणीचा दुसरा प्रकार

५) आता मिर्ची याच्यासोबत चांगली भाजून घेऊ आता मिरच्या पण आपण 2 ते 3 मिनिटे भाजून घेतल्या त्यामध्ये घालूयात हळद, चवीपुरतं मीठ घालायचे आणि त्याला मिक्स करायचे.

७)  गॅस बंद करा आणि याला थोडा वेळ परतून घ्या यांना 2 मिनिटे चांगले परतून घेतलं.  गॅस बंद केलेला आहे. आता याला पूर्ण गार करून घेऊ तर आपण हे भाजलेलं सगळं साहित्य गार केलं. त्याला मिक्सरच्या भांड्यात काढले.

मिक्सर लाऊन घेण्यासाठी साहित्य घातलं

८) यामध्ये आता घालायचे पाणी जवळपास मी अर्धा कप पाणी घातलं आणि त्याला एकदम बारीक करून घ्यायचा तर बघा. आपली चटणी तयार झाली. रंग काय मस्त आलाय.

मिक्सर ला लावून झाल्यावर चटणी

त्याला फोडणी द्यायची आहे फोडणीसाठी तव्यामध्ये मध्ये चमचा भर तेल घालायचे, यामध्ये घ्यायची मोहरी. मोहरी तडतडली की हिंग घाला. आणि  कडीपत्ता घाला. आपली फोडणी तयार झाली आहे या आता ही चटणीवर ओतायची आहे. आणि यावर घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि याला मिक्स करून घ्या.

साऊथ इंडियन डोसा इडली साठी चटणी

बघा आपली दोन प्रकारची चटणी तयार झाल्या आहेत.

तर आज आपण हीते दोन प्रकारच्यां चटण्या पहिल्या त्या कश्या वाटल्या आणि त्या तुम्ही करून मला कमेंट करून नाकी कळवा.

Leave a Comment